puran poli recipe
daily update sweet

पुरण पोळी |2023 Best Puran Poli Recipe In Marathi

foodmarathi9095@gmail.com
Spread the love

             पुरण पोळी या स्वाधिष्ट व्यांजाचे नाव इकताच तोंडाळा गोधवा सूटतो आशी महाराष्ट्राची आन बाण आणि शान असेली पुरण पोळी प्रत्येक सणाचे आकर्षण असते .पुरण  पोळी म्हणजेच कोणत्याही सणात किंवा सण नसतानाही बनवला जाणारा व्यंजन आहे . मऊसूत पुरणाची गच्च भरलेली पुरण  पोळी  नाजूक जाडसर लाटलेली खमंग तुपात भाजलेली असे बघताच तोंडाला गोडवा सुटतो आणि  पुरण  पोळी  बनवत असताना त्याचा  जो सुगंध सुटतो ना तेव्हा घरातील वातावर आनंदमय होऊन जाते  .      होळी रे होळी पुरणाची पोळी साहेबांचा खिशात बंदुकी ची गोळी हे गाणं तर प्रत्येकानी आपल्या लहानपणी ऐकलेच असेल आणि आपणही होळीचा वेळेस आपल्या लहान मुलांना हे गाणं म्हणून दाखवतो. .महाराष्ट्रात होळीचा वेळेस सर्वात जास्त महत्व पुरण पोळीला दिले जाते आणि प्रत्येक घराघरांत होळीचा दिवशी पुरण पोळी  बनवली जाते ,तसेच होळी सारख्या मोठ्या सणांत महाराष्ट्रीयन पुरणपोळी बनवतात .सर्वात जास्त भारतीय सनात दिवाळी  दसरा  मकरसंक्रांत गणपती रामनवमी अशा प्रकारांत मोठ्या सणात पुरण पोळी बनवली जाते. आज ऑनलाइनच्या या युगात जरी कोणाकडून पुरण पोळी बनवणे शक्य झाले नाही तर ते (Online Food Delevery App) वरूनऑर्डर करतात ,तसेचऑनलाईन गुगल वरती सर्च करून  यावरची माहिती पाहतातआणि बनवतात , तसेच  देवाला प्रत्यक मोठ्यासणात नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्यं देणे खूप शुभ मानले जाते म्हणून प्रत्येक महाराष्ट्रीयन हे मोठ्या सणांत नैवेद्यं म्हणून एक तरी पुरण पोळी बनवतात.

Puran Poli

Puran Poli Name in verious states

पुरण पोळीला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात – पुरण पोळी , गुजरात – पुरण पुरी , कर्नाटक – होळिगे , आंध्रप्रदेश तेलगू तेलंगणा – बोबाटाळू बाक्सम  ओळिगे , मालियालाम – पायसाबोली तामिळ – उप्पीटु  अशा प्रकारचा नावाने ओळखले जात.

पुरण पोळीचे प्रकार (Types Of Puran Poli )

  • खापर पुरण पोळी ( Khapar Puran Poli)
  • कणकेची पुरण पोळी (Kankechi Puran Poli)
  • तेलवरची पुरण पोळी  (Telavarchi Puran Poli)
  • साखर गुळाची पुरण पोळी  (Sakhar Gulachi Puran Poli)
  • विदर्भ स्टाइल पुरण पोळी  ( Vidharbh Style Puran Poli)
  • सत्तू पुरण पोळी  (Sattu Puran Poli)
  • काजू बदाम पुरण पोळी   (Kaju Badam  Puran Poli)
  •  मैद्याची  पुरण पोळी   (Maidyachi Puran Poli)
  • मुंगडाल पुरण पोळी (Mungdal  Puran Poli)
  • इन्स्टंट पुरण पोळी  (Instant Puran  Poli) याच प्रकारातील आपण आज विदर्भातील विदर्भ स्टाइल पुरण पोळी कश्या प्रकारे बनविल्या जाते ते आज जाणून घेउया.

विदर्भातील पुरण पोळी बनवण्या साठी लागणारे साहित्य (Ingridiants Of Puran Poli )

१ कप चना डाळ कमीत कमी दोन तास पाण्या मध्ये भिजलेली असावी १ कप किसलेली गुळ १ कप साखर  १ कप मैदा १ कप गावाचे पिठं २ वेलची पूड १ छोटे जायफड १/२ टीस्पून सुड पावडर                १/२ टीस्पून केसर धागा तूप १ कप दूध १/४ टीस्पून हळद थोडे मीठ Read more-https:/www.foodaniya.com Read more-साबुदाणा खिचडी

puran poli recipe
कृति ( Recipe Of Puran Poli )

Step 1 सर्वात आधी चण्याची डाळ शिजवण्या साठी एका पातेल्यात ४ कप पाणी उकळत घालावे चना डाळ एक कप घेतले असता त्या मध्ये कमीत कमी ४ कप पाणी घालावे पाण्याला उकळी आली कि त्यामध्ये भिजलेली चण्याची डाळ घालून मंद आचेवर झाकण लावून शिजू घालावी.

step 2 चण्याची डाळ शिजवत होई पर्यंत पोळीसाठी लागणारे पीठ भिजून घेऊया मैदा तांदळाचे पीठ गावाचे पीठ मीठ हळद घालून एकत्र मिसळून घ्यावी हळद घालायची नसेल तर चालते परंतु हळदीने पोळ्यांना सुंदर असा सोनेरी रंग येतो.

step 3 1 टेबलस्पून मीठ घालून पिठात चांगले रगडून घ्यावें थोडे थोडे पाणी घालूण पोळ्यांची कणिक चांगली मळून घ्यावी  जास्त घट्ट कणिक माळू नये पीठ मळून झाले कि कमित कमी अर्धा तास कनकेचा गोळा करुण झाकून ठेवा.

step 4 चण्याची डाळ शिजून झाली कि त्या डाळीतील उरलेले पाणी एका स्वच्छ पाटल्यात काढून घ्यावे चण्याच्या डाळीचा उरलेल्या पाण्यापासून विविध प्रकारचा आमट्या  बनवाता येतात जाना पूरन आमति असेही म्हणतात. पूरन शिजवत अस्ताना एका कढईत तूप घालून त्याला गरम करावे त्या नंतर त्यामधे किसलेले गूळ घालून गरम करावे. गुळाचे गरम होऊन पानी ज़ाले असता त्यामध्ये चण्याची दाल घालून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करावे व त्याला माध्यम आचेवर  शिजु घालावे  जायफड केसर धागे वेल्ची पूड याला चांगल्या प्रकारे  मिक्स करुण त्याचे  पावडर  करून घावी.

step 5 कढईतील गूढाचे पाणी आटत आले असे दिसताच गुळाचे पाणी आणि डाळ एकजीव झाले कि नाही हे बघून घ्यावे  या दोन्ही गोष्टी  जर एकजीव झाले नसतील तर त्याला आणखी २ मिनिटे माध्यम आचेवर शिजू घालावे जास्त पुरण शिजू घालू नये ,जर जास्त पुरण शिजले तर ते पीठा सोबत कोरडे मिक्स होणार नाही. पुरण  शिजले असता त्याला १५ मिनिटे थंड होण्यासाठी, एका पातेल्यात थंड पाणी घेऊन पुरण असलेली कढाई त्या पातेल्यावर ठेवावी पुरण थोडे थंड झाले असता यामध्ये तयार केलेली पावडर छान प्रकार मिक्स करून घ्यावी  आणि आणखी थोडा वेळ पुरण थंड करण्यासाठी त्या थंड पाण्याचा पाटल्यावर ठेवावे.पुरण थंड झाले असता वाटून घेण्यासाठी ते पुरण यंत्र किंवा मिक्सर मधून काडून घ्यावे.

step 6 पोळ्या बनवण्यासाठी आपण जे कणिक मुरू घातले होते ते परत एकदा चांगल्या प्रकारे मळून घ्यावे पोळ्या लाटायला सोप्या पाडाव्या म्हणून त्या कणकेला एकदम थोडे तेल लावून मळून घ्यावे जेणेकरून ते कणिक मऊ होईल.  मऊ झालेल्या कणकेचा छोट्या छोट्या पापड्या करून घ्यावयात आणि त्या पापड्यांमध्ये लाटता येईल येवडा पुरणाचा गोडा घालावा व त्या पापडीला बंद करून मोदका सारखा करून घ्यावा आणि त्याला पूर्णपणे बंद करून पोळी लाटण्यास सुरवात करावी.पोळी लाटत असताना त्या पुरण पोळीला तांदळाचे पीठ लावून लाटावे पोळी लाटत असताना कर्नाटक मधल्या होळिगे प्रमाने मोठी पण लाटता येते परंतु छोटी पोळी बनवली असता ती भाजण्यास सोपी असते. पोळी भाजत असतांना आधी तवा गरम करून त्यावर भर्गच तूप सोडावे व ते  तुप थोडे गरम झाले असता त्यावर पुरण पोळी सोडावी आणि त्या पोळीला  सोनेरी रंग येईपर्यंत तिला दोन्ही बाजूने भाजून घ्यावी  पुरण पोळीला दोन्ही बाजूने सोनेरी रंग आला असता आपली पुरण पोळी तयार झाली म्हणून अशी समजावी.

Puran Poli ( Is Good For Weight Loss )

तुम्हाला असे वाटत असेल कि पुरण पोळीमध्ये मैदा तुप असते आणि खूप गोड असते त्यामुळं ते आपल्या शरीराला हानिकारक असेल तर थांबा तुम्ही वाईट विचार करत आहेत प्रत्येक पदार्थाचे काही चांगले तर काही वाईट गुण असतातच, त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते ते म्हणजे मैद्याच्या जागी आपण गावाचे पीठ वापरू शकतो तूप कमी प्रमाणात वापरू शकतो, तसेच तुम्हाला तर माहीतच असेल पुरण पोळी मध्ये वापरल्या जाणाऱ्या गोड  पदार्थ म्हणजेच गूड यामध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक आहेत ते म्हणजे लोह पोटॅशियम कॅल्शियम आणि फॉस्फोरस आहेत. पुरण  पोळी हळू  पचत असल्या मुले ते हळू हळू एनर्जी देते. गूळ हा पाचन क्रियेस मदत करतो म्हणून पुरण पोळी पचायला जास्त जाड जात नाही आणि पचन शक्ती वाढवायसाठी मदत कारायला त्यामध्ये टाकलेली  वेलची पूड जायफड पावडर केशर हे पदार्थ सुध्दा पुरण पोळी पचविण्यास मदत करतात, म्हणून पुरण पोळी बनवा त्याला आनंदानें खा आणि इतरांना पण बनवून खौघाला सोबत सर्व मोठ्या सणांचा आनंद घ्या.

puran poli recipe

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला  मेल  करून कळवावे foodmarathi9095@gmail.com तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करूhttps:/www.foodaniya.com